राजहंस
राजहंस
कशी दाखवू मी आस
तव प्रितीच खास
आठवूनी फुलास, भुंगा मदांध
कासाविस हे हृदय, स्पर्शीन्या तव कोमल अंग
थांबवी न मन, धडधडती हृदय...
सूर्य ही धुंद, भेटण्या धरतीस
उधळूनी गुलाल-क्षितीजापाशी...
पाहता तव श्रृंगार, दाटूनी आली रात
घेता हात हातात
टेकवूनी ओठ तव अधरास
धुंद मी प्राशिन्यात श्रृंगार मदिरेस...
हरपुनी देहभान, विसरलो काळास...
कैद मी कोमल बाहूपाशात, अर्पूणी स्वत:स
हलकासा मोरपिशी स्पर्श
भूल 'स्व'त्वास, ना मृत्यूचे भान
शापित मी 'पंडू' करी मृत्यूस आवाहन
या श्रृंगारपुरात 'बंदिस्त' मी 'राजहंस'!

