STORYMIRROR

Sonali khopade

Others

3  

Sonali khopade

Others

८ मार्च - महिला दिन.

८ मार्च - महिला दिन.

1 min
138

रोज रक्तबंबाळ

स्त्री अन् स्त्रीमन

काळीज कापी

एकेक अनुभव.

मी निशा

मी उषा

कलंकीत होई

आज ना उद्या.

कोपीत मी

पण शापित मी जास्त

होई रोजच

अत्याचाराचा उद्रेक.

मी शांत

मी अशांत

छेडीते रोज

भावना मदांध.

आई मी

ताई मी

समोरच्यासाठी

फक्त बाई मी.

घाणेरड्या नजरा

स्पर्शीती मज सतत

त्यागू वाटे शरीर

कापड सम.

करीता रुकार

धावे ना एकही जन

आक्रंदते मन

माणूसकीसाठी.

रोजच्याच वासना

अन् बरबटलेल्या त्या नजरा

किळस वाटे मना

स्त्रीत्वाची.

घटता दर्घटना

धावे पत्रकार

करे पाठराखण

चारच दिवस.

कळेना फरक

पीडीत मी रोज

कधी स्वकियांकडून

कधी परकीयांकडून.

त्रासाचे हे प्रकार

एक ना अनेक

कधी दाबूनी श्वास

कधी कोंडूनी मार.

कळेना विटाळ

रोजचाच हव्यास

थोडीही न जाण

स्त्री मनाची.

स्त्री ही असे

पोरकी सदैव

परक्याचे धन

माहेरासही वाटे.

ना आड

ना विहीर

करण्या जवळ

त्यात प्रेतांचा खच.

एकच दिवस

करूनी आठवण

कशी होईल

स्त्री जातीची पाठराखण?

मीच निर्मीले

संत नी महंत

तरी मना खंत

नराधम निर्मीतीची.

भव्य हा सोहळा

भासे बैलपोळा

एकच दिवस पुरणपोळी

बाकी आसूडाची वळी!

ज्यास वाटे खरेच

करावा साजरा ८ मार्च

त्याने धरावी कास

स्त्री उद्धाराची खास.

जागवून आत्मशक्ती

हर एक मनात

निर्माण व्हावी पुन्हा

झाशीची ती तप्त ज्वाळा.

नको आधार

सहानुभुतीचा तो भास

समर्थ तू आज

मर्दीन्या महीषासूरास.

झिडकारून ही जोखडे

अबला नारीची

दाखवतू बनूनी

मार्तंड या वारीची

मार्तंड या वारीची.


Rate this content
Log in