Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Poorva Sane

Tragedy Inspirational

3.8  

Poorva Sane

Tragedy Inspirational

प्रवास

प्रवास

1 min
204



हाती हिरवा चुडा,नऊवारीचा तो थाट

मेदींच्या पावलाने ती चाले,सासरची वाट |


सुटे माहेर ते मागे, जीवा हुरहूर वाटे

 परी ओढ लावी मना, सात जन्मांचे ते नाते ।


ओलांडीता माप ,झाले फुलांनी स्वागत

कोडकौतूकाचे चार दिस ,मग संपले केव्हाच


कसे बसे त्याने ,सोसली थोडी कळ

राहवेना 'ती'च्यापासून दूर,आली सांजवेळ ।


मग रोजचाच सुरू झाला ,दारू पिऊन धिंगाणा

प्रेम, राग ,लोभ कशाने, तो काही थांबता थांबेना 


सासू ही भरे रागे हिलाच,तुझ्यातच काही कमी

वाटले सुधारेल लग्नानंतर असे पालुपद नामी ।


बाई बाई लाच टोची, लावी बोल येता जाता

माय माहेरी ही सांगे,घे तूच सांभाळून आता ।


एक दिवस झाला कडेलोट,त्याने उगारता हात

पकडला बकोटीला तिने,नेले ओढत पोलिसात ।


हाती लढ्याची मशाल , डोळ्यात पेटता अंगार,

बाजू सत्याची मांडाया,ठोकले न्यायाचे ते दार ।


सगळयांच्या कुत्सित नजरा,कोणी करेना मदत

लढा एकटीच लढून ,तिची ताकद चालली संपत ।


दमल्या जीवाला मग,दारीच्या विहिरीची आली सय

म्हणाली घे जवळ प्रेमाने, हो आता तूच माझी माय ।


पाहता वाकून विहिरीत,दिसले व्याकुळ चेहरे

नको मानू सखे हार,बघतो आशेने तूजकडे ।


पुढे टाकला पाय तिने ,तसाच मागे तो ओढला

बस्स ना थांबायचे आता,ठाम निश्चय तो केला ।


Rate this content
Log in