STORYMIRROR

Poorva Sane

Tragedy

4  

Poorva Sane

Tragedy

पाऊस तुमचा माझा

पाऊस तुमचा माझा

1 min
238

तुमच्यासाठी असेल आशिक पाऊस

आमच्यासाठी नुसती त्सुनामी

छप्पर सांधेपर्यंत घुसते

दारामधूनी तुफान पाणी


तुम्हास त्याचे कौतुक भारी

आमच्या साठी संकट दारी

तुम्ही रचिता प्रेमकविता

आम्हा ग्रासते उद्याची चिंता


लेकरांसंगे मौजमजेच्या

वर्षासहली निघती तुमच्या

कौतुक काय आम्हास तयाचे 

घरीच शिरते पाणी आमुच्या


सुरकूतली गाठोडी आयुष्याची

थंडी भरुनी कुठे कुडकूडती

दूर कुठेतरी बाळे सानुली

भुकेने आर्त विव्हळत रडती 


भिजून गेली चूल बिचारी

शिजवावयास तरी काय उरले?? 

लाकडेही सर्व ठार ओली

दुर्लभ दोन घासही झाले 


पाऊस तोच तो एकसारखा

तुमच्या माझ्या छपरावरचा

फरक इतुकाच आहे वेड्या

तो बरसतो.....

दारी पागोळ्यातूनी तुझ्या अन्

इथे पापणीआडून आईच्या...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy