प्रिये तुझ ते प्रेम
प्रिये तुझ ते प्रेम
प्रिये,तुझ ते सुंदर प्रेम मला
कधी विसरताच नाही आल
आज बरसला पाऊस तर
मन पुन्हा भावप्रवाहित झाल ...१...
त्या रिमझिम बरसणाऱ्या पावसात
जेव्हा प्रिये,तू मला मिठीत सामवल
खरच सांगतो तुला, तेव्हा माझ हे
रुक्ष जीवन पुन्हा नव्याने बहरल...२...
बहरू लागल होत प्रेमाच वटवृक्ष
तेव्हा नियतीने तुला अस हिरावल
तू गेलीस प्रिये, मला एकाकी सोडून
तुझ प्रेम मात्र कायम स्मरणात राहल...३...
तुझ सौंदर्य जसं चिरंतन होत तसच...
तुझ प्रेम आजही चिरंतनच राहल
प्रिये तुझ्यासाठी केलेल्या कवितांनी
एकाकी वळणावर मला जगणं शिकवल...४...
तुझ्या प्रेमाच्या आठवणीत जगताना
माझ मन तुझ्यावर काव्य रचत गेलं
विसरलो आयुष्यातील अनेक आठवणी
पण तुझ ते प्रेम आजही आठवणीत राहल...५...
