माझे ते सुंदर गाव
माझे ते सुंदर गाव
1 min
257
माझे ते सुंदर इवलेसे गाव
नाळ मातीशी जुळून ठेवते
निसर्गाच्या सान्निध्यात हळूच
तत्वज्ञान आयुष्याच शिकवते...१...
निळे आकाश,वृक्षांची हिरवळ
निसर्गाचे हे रुप मना सुखावते
सर्जाराजाच्या संगतीन राबताना
बाप माझा मातीशी एकनिष्ठ राहते...२...
माझ्या गावची ती सुवासिक माती
कस्तुरीच्या सुगंधालाही लाजवते
त्या मातीत आयुष्य कालवतांना हो,
माय माझी बहिणाईची ओवी गाते...३...
गावातील ते छोटसं कौलारु घर
नात्यातील गोडवा आजही जपते
पशू-पक्षी,निसर्गा संगतीन जगतांना
ग्रामसंस्कृती जगण्याच गुपित सांगते...४...
ग्रामसंस्कृतीच हे आश्वासक चित्र पाहता
आजही मन आनंदाचे उधाण भरते
जपायला हवा हा सौंदर्याचा ठेवा कारण,
हेच माणसाला माणसात कायम राखते...५...
