प्रेमाचा भाव फुलला
प्रेमाचा भाव फुलला
दारी वाजतो सनई
चौघडा गाजा बाजा
मेहंदीच्या रंगात
प्रेमाचा भाव फुलला...
नववधूच्या हसण्यात
गोड मधाचा गोडवा
मेहंदीच्या रंगात
प्रेमाचा भाव फुलला...
हळदीच्या गुणांचा मोह
चेहऱ्यावर खुलला
मेहंदीच्या रंगात
प्रेमाचा भाव फुलला...
डोई बाशिंग सौदंर्य
शृगांर सजला
मेहंदीच्या रंगात
प्रेमाचा भाव फुलला...
माहेरचा गंध सोडून
सासरी शिंपला
मेहंदीच्या रंगात
प्रेमाचा भाव फुलला...

