प्रेम वेडी
प्रेम वेडी
जिच्या प्रत्येक शब्दात,
असते अमृताची गोडी..
दिसते अशी परीसारखी,
अशी ती माझी प्रेमवेडी..!!
कधी ती रुसते माझ्यावर,
तर कधी राग करते थोडा..
प्रेमही ती जीवापाड करते,
म्हणून मी तिचाच प्रेमवेडा..!!
स्वप्नामध्ये तर मी तिला,
रोजच एक KISS करतो..
दिवसभर या क्षणाला,
मी सारखाच MISS करतो..!!
केसाच्या फुग्याची तिच्या,
असते डोळ्यावर सावट..
हळूच घेता मिठीत तिला,
तर म्हणते मला चावट..!!
अशी ही ती माझी प्रेमवेडी,
काळजात खोलवर रुजलेली..
माझ्याशी लग्न करण्यास,
ती प्रिन्सेस सारखी सजलेली...!!!

