प्रेम तुझे रे
प्रेम तुझे रे
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
46
प्रेम तुझे रे
खुणावते रे
कशी आर्जवू
ये प्रेमाने रे... ||१||
असे फुलावे
धुंद जगावे
हिंदोळ्यावर
स्वैर झुलावे... ||२||
प्रेम पाखरे
करू साजरे
पाऊसपाणी
निर्मळ झरे... ||३||
एकमेकाचे
विश्वास व्हावे
हर प्रश्नाला
उत्तर द्यावे... ||४||
खरी संगती
प्रेम पावती
समाजमान्य
मिळे संमती... ||५||
स्वप्न उद्याचे
या पावसाचे
जे पृथ्वीवर
बेधुंद नाचे ... ||६||
तुझा शहारा
गुमान वारा
हर जन्मी तू
अढळ तारा... ||७||
चिंता कसली
गाली हसली
निकोप जेव्हा
प्रेमी दिसली... ||८||
अशी ही गोड
अभेद्य जोड
नकोच आता
पदरमोड..!... ||९||