प्रेमशब्द
प्रेमशब्द
तू वेडी स्वप्नश्री
मला अनभिज्ञ राहू दे
शुभ्र चांदण्यांच्या साक्षीसह
तू राधा, मज श्रीहरी होऊ दे
तू गोड गुलाबी हसू
मला तरंग राहू दे
सागरात बिनशिडाचा
बेवारस गलबत राहू दे
तू हवाहवासा गंध
मला वाऱ्यावरती वाहू दे
त्या भुललेल्या आडवळणात
मज पथिक राहू दे
तू दिवसाची सांज
मला अथांग क्षितिज राहू दे
बहरलेल्या दाटीमध्ये
मला पर्णहीन होऊ दे
तू चंद्र चांदणी चमचमती
मला अनामिक होऊ दे
प्रीती तुझी चोरताना
मला निःशल्य राहू दे...

