STORYMIRROR

श्री.दीपक सहाणे सर.

Inspirational

3  

श्री.दीपक सहाणे सर.

Inspirational

प्रेम कुणावर करावे....

प्रेम कुणावर करावे....

1 min
270

प्रेम कुणावर करावे, प्रेम कुणावरही करावे;

प्रेम प्रेमळ आईवर करावे;

प्रेम कष्टाळू वडिलांवर करावे;

प्रेम करावे, त्या जन्म देणाऱ्या माता-पित्यावर...

प्रेम कुणावर करावे, प्रेम कुणावरही करावे;

प्रेम राजासारख्या भावावर करावे;

प्रेम परीसारख्या बहिणीवर करावे;

प्रेम करावे, त्या खेळकर दादा-दीदीवर...

प्रेम कुणावर करावे, प्रेम कुणावरही करावे;

प्रेम स्वप्नातल्या प्रेयसीवर करावे;

प्रेम वास्तवातल्या पत्नीवर करावे;

प्रेम करावे, त्या जीवनभर साथ देणाऱ्या जीवनसाथीवर...

प्रेम कुणावर करावे, प्रेम कुणावरही करावे;

प्रेम शिक्षा करणाऱ्या सरांवर करावे;

प्रेम मायेने जवळ घेणाऱ्या टीचरांवर करावे;

प्रेम करावे, त्या वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंवर...

प्रेम कुणावर करावे, प्रेम कुणावरही करावे;

प्रेम निळ्याभोर आकाशात भरारी घेणाऱ्या पक्ष्यांवर करावे;

प्रेम घनदाट जंगलात फिरणार्‍या प्राण्यांवर करावे;

प्रेम करावे, त्या बोटांवर आठवण म्हणून रंग सोडून जाणाऱ्या फुलपाखरांवर...

प्रेम कुणावर करावे, प्रेम कुणावरही करावे;

प्रेम निरागस बालकांवर करावे;

प्रेम नाजूक झाडावरील कळीवर करावे;

प्रेम करावे, त्या देवाघरची फुले असणाऱ्या छोट्या मुलांवर...

प्रेम कुणावर करावे, प्रेम कुणावरही करावे

प्रेम कुणावर करावे, प्रेम कुणावरही करावे

साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from श्री.दीपक सहाणे सर.

Similar marathi poem from Inspirational