प्रेम की यातना?
प्रेम की यातना?
ती माझ्या स्वप्नातल्या परीसारखी बिलकुल नव्हती
ती पाहताच क्षणी आपलीशी वाटणारी नव्हती
सर्वांसमोर लाजणारी ती
माझ्यासोबत बिनधास्त वागायची
वेळ बदलला तशी ती बदलली
कोवळी कळी आता नुकतीच फुलू लागली होती
आता बिनधास्त सर्वांसमोर
अन मला पाहून लाजू लागली होती
माझंही वागणं बदललं होतं
तिच्यापासून दूर पळणारा मी
आता तिच्यामागे धावत होतो
तिच्यासोबत असताना मी पुरता हरवून जायचो
माझं मलाच कळलं नाही कधी प्रेमात पडलो तिच्या
सुरुवातीला कधी मैत्री होईल असंही वाटलं नव्हतं
पण कुणास ठाऊक कसं काय
हळूहळू एक वेगळंच नातं विणल जात होत
प्रत्येक गोड वाटणाऱ्या गोष्टींचा शेवट जसा गोड होत नसतो
तसाच झाला शेवट त्या विलक्षण कथेचा
गैरसमज झाला वाद-विवाद वाढला
आणि वाढला दुरावा
खूप काळ लोटला पुन्हा भेट झाली
पूर्वीसारखं सर्व व्हावं असं वाटत होतं मनोमनी
मी तसाच होतो अजून<
/p>
ती मात्र फारचं बदलली होती
पुन्हा झाला वाद
पण या वेळी
तिच्याऐवजी माझा पारा जास्त चढला
आधी तिनं मला दुखावलं होतं
आता मी तिला दुखावलं होतं
दुखावून तिला मी स्वतः दुखावून गेलो
मी बदललो
परत भेट झाली
आधीचं काही आठवलं की त्रास होतो
असं म्हणाली ती
तिला त्रास होतो
म्हणून मीही तो विषय पुन्हा काढला नाही
पुन्हा परत याहूनही वाईट होईल
म्हणून मी स्वतःच अंतर ठेवलं
वेळ लागला पण जमलं
या गोष्टीचा काहीच शेवट नव्हता
सगळं अर्धमुर्ध राहिलं
आता रुसवा नाही
पण तरीही अबोला कायमचा
झालीच भेट तरी
काही बोलता येणार नाही
आठवण आली त्या क्षणांची
तर एकच प्रश्न पडतो
हे प्रेम की यातना?