प्रेम दिवाना
प्रेम दिवाना
अरे चाहूल चाहूल
लागे थंडीची चाहूल
गार वाऱ्याची झुळूक
घ्यावी पांघरूण शाल
ऊनी कपड्याची रास
येते तुझी आठवण
प्रेम दिवाना झालो गं
मन गेले गारठून
लागे थंडीची चाहूल
वाटे कुशित शिरावे
तुझ्या हाताचा विळखा
घट्ट भोवती पडावे
तुझ्या कुशीत शिरता
विसरलो देहभान
थंडी कुठे गं पळाली
चिंब भिजता मनान
तुझ्या गं बाहुपाशात
ऊब प्रेमाची लहर
हवी कशाला शाल
मनी अलाव अपार

