प्रारब्ध
प्रारब्ध
तुझ्या रुक्ष वागण्यामुळे
माझाही प्रीतीचा झरा आटत आहे
कारण की सर्वच मला
एकतर्फी वाटत आहे
तू सदा ना कदा
माझ्याकडे
भयंकर तिरस्काराने बघतो
मला माहित आहे तुझं
प्रेम नाही माझ्यावर
मग ते तू वारंवार का
दर्शवतो माझ्या मनावर
सारखं आपल हिडीस
फिडीस करतो मलाही
इतका काय केला मी
तुझं गुन्हा
मला जाणवतो
सतत उपेक्षित पना
सर्वांना माझे गुण दिसतात
एकमेव तू असा आहेस
तुला माझे दुर्गुण दिसतात
तू तुझ्या रस्त्याने जा म्हणाल
तर जायचं ही नाहीआणि मला
मानसिक त्रास दिल्याशिवाय
राहायचं ही नाही
तुझे अहंकार तुझ्यापाशी
मला आतातरी सुखाने
जगू देशी
