STORYMIRROR

Jayashree munde

Others

3  

Jayashree munde

Others

स्वातंत्र्याची हवी प्रचिती

स्वातंत्र्याची हवी प्रचिती

1 min
239

स्वातंत्र्याची हवी प्रचिती

स्वातंत्र्यावर जडावी प्रीती

स्वातंत्र्याचा उपभोग घेण्या

गगनी पक्षी स्वच्छंद विहरती


फुलपाखरं सम बागडण्या

 सर्वांना मनापासून आवडती


निसर्गातील झरे निरागस 

स्वातंत्र्या मुळे तर खळा लती

सागराच्या लाटा सुद्धा 

विना तमा स्वातंत्र्या मुळे उसळती

एवढी मोठी स्वातंत्र्याची महती

म्हणून हवी सकलाना

स्वातंत्र्याची प्रचिती


सुमनांचे सौंदर्य पाहण्या 

नयन साऱ्यांचे आतुरती

स्वातंत्र्याच्या पवनामुळे 

दिलखुलास पुष्प बहरती


स्वातंत्र्याने कला विकासती

सुप्त गुण नाना अवगती

आत्मचिंत न सतत घडती

यश शिखरावर पाऊले पडती

स्वातंत्र्याची गाते मी महती

त्यामुळे सुधारते सर्वांची नीती

म्हणून म्हणते आज मी सकाला ना

स्वातंत्र्याने जगा जगु द्या इतरांना


प्रत्येक जीवास हवी स्वातंत्र्याची प्रचिती 

त्यामुळे घडती राष्ट्राची प्रगती


Rate this content
Log in