पहिल्या प्रेमाचा सहवास.......
पहिल्या प्रेमाचा सहवास.......
*पहिलं प्रेम......*
पहिल्या प्रेमाच्या सहवासाची आठवण आजही करते मनाला व्याकुळ
माझ्या हातात असताना तीचा हात
अस वाटायचं हेच माझं नंदनवन आणि हेच माझं गोकुळ.....
जेव्हा भिडायच्या तीच्या नजरेशी नजरा
बेभान व्हायचं हे वेड मन
वाटायचं जणू करतोय हा निसर्ग माझ्या प्रेमाला मुजरा.......
अंधारलेल्या जिवनात प्रकाशावानी मिळाली साथ तीची
अडखळलेल्या आयुष्याला
पहिल्या प्रेमाने
घातलेली ऐकू येई साद तीची.....
बेभान झालेल्या मनाला सावरलं
क्षणोक्षणी तीने
तीची साथ जशी ह्रदयाने ह्रदयाला दिलेली हळूच चाहूलं.....
भरकटलेलं माझं हे वेड मन
कधी सोधायचा तीला स्वप्नात
तर कधी राना वनात
जेव्हा ती मिळाली तेव्हा तर वाटे या जिवाला सोबतचं तीच्या जगावं प्रत्येक क्षण आणि सोबतचं व्हाव अजरामर........
प्रेम हे कधी कळून होत नसतं
ते तर नजरेचा खेळ असतो
खऱ्या प्रेमाला नसतो वय, जात,आणि अंत
प्रत्येकाला मिळत नाही खर प्रेम हिचं वाटते खंत........
पहिलं प्रेम तीचं उन्हामध्ये जणू सावली
तहानलेल्याला जणू अमृत वाटते पाणी
माझ्यासाठी तशीचं ती म्हणून तर पहिल्याचं नजरेतं ती मला भारावली..............
स्वप्नात सुध्दा तीचं असायची आणि विचार सुद्धा नेहमी तीचेच मनात भिरकायचे
वाटलं नव्हतं पण कधी
एका चुकीने पहिले प्रेम क्षणात असे दुर जायचे.........
पहिलं प्रेम आयुष्यभर टिकवायला नशीबचं लागतं
नात्यामध्ये प्रेमाचा ओलावा आणि भावनांना एकमेकापर्यंत पोहचायला प्रेम सुध्दा खरचं लागतं........
पहिलं प्रेम हेचं खरं प्रेम असतं
पुन्हा - पुन्हा होतो ते प्रेम तर क्षणभंगुर असतं.......
*अनिकेत अनिल राठोड*
*गावंडगाव अकोला*
*मो ९०६७९७९६०७*

