STORYMIRROR

Prajakta Bokefode

Romance Others

4  

Prajakta Bokefode

Romance Others

पहिली मैत्री पाहिलं प्रेम

पहिली मैत्री पाहिलं प्रेम

1 min
349

नकळत तुझं मित्रत्व


मी जेव्हा हसून स्वीकारलं होतं माझ्या भावनांचं विश्व


तेव्हांच विस्तारलं होतं.....


तू समोर आल्यावर


शब्द मात्र सारेच पळून जायचे


तू गेल्यावर मग मात्र काय काय सांगायचं होतं याची आठवण होत होती....


रोज बघणं


आयुष्यातली एक सवय बनत गेली तुझ्या फोनची वाट पहाण्यात संध्याकाळ माझी विरत गेली.


मैत्री एवढी सुंदर असते हे तुझ्या रूपाने जाणवलं


मनाला मोहवणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्यावेळी तुझचं रूप


दिसलं...


धबधब्यासारखे दिवस वाहत राहिले असताना तुझ्या


सहवासात मैत्री नकळत मागे पडली


आणि एक प्रेमांकुर उमलला मनात.....


आता तू असतोस सोबत


म्हणून मी स्वतरूवरच खूश असते


रोजचीच संध्याकाळ आता


अजूनच छान दिसतं....


वाटतं एकदा सांगून टाकावं मनातलं गुपित सारं


दुसऱ्याच क्षणी जाणवतं


 कि मी तुला सोडून एखाद्या अनोळखी शहरात राहू शकत


नाही ते समजल्यावर सगळं तू


अजूनचं दूर गेलास तर ?.. एकदा मनातले सर्व काही येणारे विचार बदलून हो म्हणून


तर बघ


तुझ्यासाठी पूर्णपणे स्वभाव बदलेन तुझ्या वाटेतले काटे पापण्यांनी उचलून फक्त फुलंच त्यावर


पसरेन.


मला तुला आयुष्यात खूप सुखी झालेलं बघायचयं रात्री झोपशील ना जेव्हा तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं समाधनाचं


हसू, हळूच डोळ्यांना टिपायचयं....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance