STORYMIRROR

Ambika Bhore

Romance

3  

Ambika Bhore

Romance

पाऊस आणि तो...

पाऊस आणि तो...

1 min
253

किती ही नाही म्हणलं तरी

पाऊस आणि तो सारखेच भासतात मला....


त्याच अवचित येणं आणि सरींनी चिंब करणं...

अगदी तुझ्यासारखाच....


त्याचा गारवा अंगाला शहारा आणणारा...

अगदी तुझ्या आठवणींसारखाच...


पाऊस आणि तू असे का छळताय ना मला कळतच नाही...

एकदाच येऊन तो ही मनासारखा

कोसळत नाही...

तू ही तसाच...

येतो म्हणतो फक्त... येण्याची 

सवड काही तुला 

मिळत नाही...


एकदा ये आणि बघ जरा...

किती पसारा मांडलाय

तुझ्या आठवणींनी...

किती आवरू मी याला...

तुझ्याशिवाय नाही रे

जमायचं आता मला...


तुझ्या आठवणींत खूप काळ गेलाय...

आता तरी ये आणि चिंब भिजव मला...

मी तृप्त होई पर्यंत...


तुझ्या मिठीत येऊन सगळं

विसरायचं आता मला...

फक्त तू ,मी आणि पाऊसच हवाय आता....

मला शांत करायला...


पावसाळ्यातील तुझं येणं आजही आठवतं मला...

नुसतं आभाळ भरलेलं दिसलं की भेटायला यायचा मला...


किती ओढ होती तुला प्रत्येक पावसात 

भेटण्याची मला...

म्हणायचास...

पाहायचंय त्या सरींमध्ये चिंब-चिंब भिजलेलं तुला...


पाऊस आणि मी आलो की ,

किती खुलत तुझं रूप...

नाहीतर असतेस बसून...

सारखी रुसून...


तुला ही माहीत होतं...

मग ,मी ही आतुरतेने वाट पहायचे तुझी कारण...

पाऊस आला की तुझं येणं ही व्हायचंच...

हे मला ठाऊक होतं...


आज ही मला तुझी तितकीच ओढ आहे...

तू सगळं विसरला असलास तरी...

हा पाऊस मला काहीच विसरू देत नाही...


मी आज ही वाट पहातीये...


आज ही ये ना तसाच...


आज ही तुझी ओढ तशीच आहे कायम...

त्या पावसाला जशी आहे धरे ला भेटण्याची...

तुला ही वाटलं असेल ना कधी भेटावं मला...

आतुर मी ही आहे या...

धरे सारखीच...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance