STORYMIRROR

Ambika Bhore

Romance

3  

Ambika Bhore

Romance

पाऊस...

पाऊस...

1 min
248

पाऊस पडतो म्हणजे..?

नक्की का इतक्या जोरात तो ,

कोसळत असेल रे...?

किती तरी साठलेलं असेल ना ,

त्या आभाळाच्या मनांत...?

कोणी तरी आहे

आपलं ऐकायला...

म्हणूनच तर तो

इतक्या आवेगाने

येत असेल ना...

त्या जमिनीला

भेटायला...

तिची इतक्या

दिवसांची प्रतीक्षा

संपलीये...

हे सांगायला...

आणि हवं ना रे असं

कोणीतरी...

नेहमीच आपली

वाट पाहणारं...

आपल्याला काहीतरी

सांगण्यासाठी ,

आतुर असलेलं...

आणि त्यासाठी 

किती ही काळ

प्रतीक्षा करणार...

अगदी ,

पाऊस आणि या जमिनीसारखं...

नेहमीच एकमेकांची ओढ असणार...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance