STORYMIRROR

Prakash Patil

Classics

3  

Prakash Patil

Classics

पाऊस आणि निसर्ग

पाऊस आणि निसर्ग

1 min
1.2K

पावसाचा हात धरून

पळत सुटावं माळरानात...

मनातलं गुपित-

हळूच सांगावं वाऱ्याच्या कानात...

 

ढगाच्या कुशीत बसून

फिरावं जगाच्या डोक्यावरुन...

पटापट टिपावीत हिरवीकंच छायाचित्रे,

विजेचे प्रखर फ्लॅश वापरून...

 

रानातल्या निर्झरासोबत  

लहान मुलागत बागडावं...  

धो धो हसणाऱ्या धबधब्याच्या मिठीत 

डोळे मिटून शिरावं...

 

पाऊस जेव्हा धरेल ठेका मल्हार रागावर,

डोक्यावर धरावी आभाळाचीच छत्री...

भिजावं निसर्गासोबत आतल्या आतच,

निसर्गाशी अशी करावी घट्ट घट्ट मैत्री...

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics