STORYMIRROR

Prakash Patil

Others

3  

Prakash Patil

Others

माझी मराठी

माझी मराठी

1 min
119

कधी पेरूची, कधी आंब्याची फोड वाटते-२बोलतांना, ऐकतांना माझी मराठी गोड वाटते...

केली भटकंती, हिंदी इंग्रजीची किती जरी-२घरी परततांना माय मराठीची ओढ वाटते...

व्यक्त होण्यासाठी मराठी, नको भाषा परकी-२नाही माझ्या मराठीस कुणाची तोड वाटते...

भाग्य आमुचे संत-शुरांच्या भूमीत जन्मलो हे-२अशा महाराष्ट्रभूमीची मराठी अजोड वाटते

लावावे रोप जिथे तिथे माझिया मराठीचे -२फुटतील मग मराठीस नवे नवे मोड वाटते...


Rate this content
Log in