STORYMIRROR

Jyoti Kadam

Tragedy

3  

Jyoti Kadam

Tragedy

नवीन सूर्य

नवीन सूर्य

1 min
135

अंधा-या गडद बोगद्यातून

सरपटत चाललोय आपण

अंधुकशा उजेडअपेक्षेने..

मागे पडल्या आहेत

अनेक शुभ्र पाऊलखुणा

गतसंस्कृतींच्या

अस्ताव्यस्त पडली आहेत

बेवारस प्रेतं

आपल्याच माणसांची

थेंबभर पाण्याची तडफड

उराशी बाळगून

कुणी द्यावा कुणाला प्रेताग्नि

कुणी कुणासाठी गाळावीत टिपं..

सगळेच चालताहेत

एका समांतर प्रवासरेषेत

मृत्युच्या अज्ञात हाकेच्या दिशेने..

आईनस्टाईनचा फार्म्यूला,

एसएलआर..बाँम्ब..इ.

सगळंच नामशेष

उरलाय केवळ

प्राणांतिक दंश

जैविक अस्त्रांचा.

बोगदा संपत नाहीय...

उजेड दिसत नाहीय..

चालत रहावंच लागेल

नवीन सूर्य उगवेपर्यंत..

तू आळवत रहा

रविंद्रनाथाच्या कविता

आणि

ज्ञानेशाचं पसायदान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy