नको जीव घेऊस रे कोरोना
नको जीव घेऊस रे कोरोना
नको जीव घेऊस रे कोरोना
आता नाही सहन होत या यातना
ये बाबा जाणारे कोरोना
नाही जवळ रे माझ्या,माझा बाप
लागते रे जीवाला, पुन्हा पुन्हा धाप
मन नाही लागत रे बापाविना
पुन्हा एकत्र आण ना,आम्हाला सर्वांना
ये बाबा जाणारे कोरोना
आता नाही सहन होत या यातना |1|
मी आणि माझी,आई वेगळ्याच गावात
आणि बाप अडकलाय,वेगळ्याच राज्यात
भरलाय रे,दोघ घरात किराणा
पण बापाविना,तोंडात घासच जाईना
ये बाबा जाणारे कोरोना
आता नाही सहन होत या यातना |2|
नियमित फोनवर,बाबांशी बोलते माझी आई
तिला पण माहीत आहे,बोलायला काहीच नाही
फक्त सोबत आहोत,याचीच जाणीव करून देई
आता तरी जाण,माझ्या आईच्या वेदना
ये बाबा जाणारे कोरोना
आता नाही सहन होत या यातना | 3 |
चेहरा उतरवून बसलेली असते,माझी ताई
मुलगा हिम्मतवाण आहे,म्हणून खूश होते माझी आई
सर्व झोपी गेल्यावर,माझ्या अश्रूंना ,मीही थांबवू शकत नाही
कोणाजवळ व्यक्त करू मी?या सागरा पेक्षा विशाल,अशा दुःखद भावना
ये बाबा जाणारे कोरोना
आता नाही सहन होत या यातना |4|
