नातं आपलं...
नातं आपलं...
तुझं माझं नातं म्हणजे
पानावरील दवासारखं
दव पानावर असुन सुद्धा
त्या सॊबत नसणारं
तुझं माझं नातं म्हणजे
चंद्र आणि सूर्यासारखं
एकमेकांसोबत असतानाही
कोणालाही न दिसणारं
तुझं माझं नातं म्हणजे
आकाश आणि जमिनीसारखं
एकमेकांच्या समोर असतानाही
भेटीसाठी आतुरलेले
तुझं माझं नातं म्हणजे
वारा आणि सुगंधासारखं
एकमेकांच्या नकळतच
एकमेकांना सतत सोबत ठेवणार
तुझं माझं नातं म्हणजे
जीवन आणि मरणासारखं
जीवन म्हणून कितीही एकमेकांच्या जवळ येण्याच्या प्रयत्न केला
तरी मरणाच्या यातना असलेल्या समाजाच्या बंधनांना
न तोडता येण्यासारखं...