नाते प्रेमाचे
नाते प्रेमाचे
शुद्ध भावे प्रेमे पूजिता
नित्य आनंद वसे मनी
अंतःकरणी अहं विराजीता
दुःख दाटे जीवनी
जीवाशी जीव देई
ऐसा जीव जीवनी जोडावा
जोडीले जाणोनी जाळे
सुक्ता सवे सुक्ताशी ना तोडावा
सांगे संत गुणी गुणवंत
नाते प्रेमाचे तोडोनी तुटेना
नीरे सोडू पाहे गा-याशी
गारा नि-यासवे सुटेना