मृद्गंध पावसाचा
मृद्गंध पावसाचा
सावळे ढग लेवुनी
अंधार पेरलास तू
शित वारा लहरता
रडलास का सांग तू ...(१)
बरसणाऱ्या धारात
वेचले क्षण प्रीतीचे
धुंद त्या आठवणींचे
मस्तीतच डुंबायचे ...(२)
सुगंध ओल्या मातीचा
दरवळे भोवताली
सुखावून गेली मज
हिरवाई सृष्टीतली ...(३)
मी गारठल्या कानांनी
पाऊस ऐकला होता
तुझा श्वास तुझा स्पर्श
मनांत भरला होता ...(४)
विरह असह्य झाला
पावसाळे आठवतो
आता फक्त ओल्या शब्दां
कुरवाळत बसतो