STORYMIRROR

Pavan Kamble

Romance

3  

Pavan Kamble

Romance

मनातलं बोलायचंय...

मनातलं बोलायचंय...

1 min
289

आज थोडंस मनातलं बोलायचंय

तुझ्यासमोर मनातील शब्दांना मोकळं करायचंय

जे आजपर्यत ओठांवर आले नव्हते

ते आज तुला सांगायचंय..


आज थोडंस मनातलं बोलायचंय

स्वप्नात घेऊन तुला तुझ्यासोबत काही अंतर चालायचंय 

तुझ्या हातात हात घेऊन तुला मनोसक्त बघायचंय

तू का बगतोस रे अस मणल्यावर

तुला उत्तर देत बसायचंय.. 


आज थोडंस मनातलं बोलायचंय

तुला दुःखी झालेलं पाहून

मला तुझा आधार बनायचंय

रडतेस का असा म्हणून तुझी समजूत काढायचंय..


आज थोडंस मनातलं बोलायचंय

आसवांना माझ्या शब्दात मांडायचंय

आणि स्वतःलाच कवितेतून आज बाहेर आणायचंय..


बस झालं आता तुझ्याशी शब्दांत बोलणं

तुला बोलायला शब्दांचा आधार घेणं

खूप झालं तुझ्याशी हे कोड्यात बोलणं

आज तुझ्याशी स्पष्ट बोलायचंय 

पण आज थोडस मनातलं बोलायचंय...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance