मन माणुसकी
मन माणुसकी
मानवा-मानवा तू स्वतःला सावर रे,
पण स्वतःला सावरता-सावरता माणुसकीची साथ घे|
नैसर्गिक आपत्ती, वैयक्तिक संकटे असती सारी भारी,
समाजमनाचा आधार घेऊनी त्यांच्यावरी तू मात करी।
समाजसेवेचे व्रत हे सर्व जगी श्रेष्ठ आहे रे,
पण स्वतःला सावरता -सावरता माणुसकीची साथ घे।
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने ते घेत जावे,
असे करता-करता स्वतःच मालामाल व्हावे।
अशा स्वार्थापायी स्वतःचे नुकसान करून घेऊ नको रे ,
पण स्वतःला सावरता-सावरता माणुसकीची साथ घे।
सध्याच्या युगात राजकारणी तुपाशी तर जनता सारी उपाशी,
मेहनत, काबाडकष्ट करावे स्वाभिमान बाळगून उराशी।
राजकारण्यांच्या अशा फसव्या फंदात तू पडू नको रे,
पण स्वतःला सावरता-सावरता माणुसकीची साथ घे।
महापुरुषांचे स्मरण करूनी विचारी क्रांतीची मशाल हाती घे,
धर्माच्या शाब्दिक युद्धात न पडता समतेचा नारा तू सदैव दे।
क्रांतिकारी विचारांचे बळ घेऊन तूच होई तुझा सोबती रे,
पण स्वतःला सावरता-सावरता माणुसकीची साथ घे।
मानवा-मानवा तू स्वतःला सावर रे,
पण स्वतःला सावरता-सावरता माणुसकीची साथ घे।
