STORYMIRROR

Rajesh Gorivale

Inspirational

3  

Rajesh Gorivale

Inspirational

माझे बाबा

माझे बाबा

1 min
344

शून्यातूनी विश्व निर्मूनी, तुम्ही आम्हाला घडविलात,

पण बाबा, तुम्ही आमचे सर्वस्व होतात.....।।


आईसारखी मायेची ऊब तुम्ही आम्हां दिलीत, 

सुखाचा प्रेमळ घास स्वतः हाताने भरविलात,

बाबा असूनही तुम्ही आमची आई झालात, 

पण बाबा, तुम्ही आमचे सर्वस्व होतात....


जीवन जगताना जीवनी खाचखळगे पाहिलात, 

कुटुंबावर कोणताही भार नको ? म्हणून प्रयत्नात राहिलात,

संपूर्ण परिवाराच्या सुखासाठी जीवाचे रान केलात, 

पण बाबा, तुम्ही आमचे सर्वस्व होतात.... 


स्वतः कष्ट करून तुम्ही आम्हाला शिकविलात,

जिद्द अन् ध्येयाचे धडे देऊन बदल घडतोय आमच्या जीवनात, 

नियतीच्या संकटांपुढे लढण्याचे बळ तुमच्यामुळे आलंय अंगात, 

पण बाबा, तुम्ही आमचे सर्वस्व होतात.... 


तब्बेतीची काळजी न करता नेहमी पाठीशी उभे राहिलात, 

प्रामाणिकपणा व स्वाभिमान यांमुळे राहिलात सदैव आमच्या स्मरणात, 

" जगावे परी किर्तीरुपे उरावे " या म्हणीप्रमाणे होतोय गौरव तुमचा समाजात, 

पण बाबा, तुम्ही आमचे सर्वस्व होतात....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational