STORYMIRROR

Rajesh Gorivale

Others

4  

Rajesh Gorivale

Others

पाऊसधारा

पाऊसधारा

1 min
238

थुई-थुई नाचे मन मोराचा पिसारा,

जेव्हा बरसती नभातूनी बेधुंद "पाऊसधारा"...

मनाचा थांग कधीच कुणा लागेना, 

असाच अवखळ पाऊस कधीच ना उमगेना,

मनाची धगधग उसळवित वाहे सोसाट्याचा वारा, 

जेव्हा बरसती नभातूनी बेधुंद "पाऊसधारा"...

वृक्षांची नवी पालवी खुळ्या मनास मोहवी,

पानोपानी खुलतसे त्याची इंद्रधुनी छवी,

झाडांचीया सावलीत गाई-गुरे शोधती निवारा, 

जेव्हा बरसती नभातूनी बेधुंद "पाऊसधारा"...

पावसाच्या प्रत्येक थेंबात पाणी अन् तीच जुनी गाणी,

पण शब्दाविना आकाशाशी आनंदाची देणी-घेणी, 

पावसाच्या वाहती धारा,डोईवरी करती मारा, 

जेव्हा बरसती नभातूनी बेधुंद "पाऊसधारा"....

आयुष्याचा झाला गुंता,मन झाले ओलेचिंब,

कधी हसत तर कधी रडत,नाचू होऊनी बेधुंद, 

जीवनातील नशिबाचा फुलत राहिल पिसारा, 

जेव्हा बरसती नभातूनी बेधुंद "पाऊसधारा"...

थुई-थुई नाचे मन-मोराचा पिसारा,

जेव्हा बरसती नभातूनी बेधुंद "पाऊसधारा"...

Rate this content
Log in