STORYMIRROR

Yogesh Sawant

Abstract

2  

Yogesh Sawant

Abstract

मिलन

मिलन

1 min
299

सख्या तू सोबत असताना

उठतात प्रचंड वादळे श्वासांची

ढगांच्या कडकडाटाने अंतरंगातून

माझं काळीज उंचबळून येतं

धरा दुभंगणारा विजेचा लोळ

शरीरातून धावत जातो


बेफाम वेगाने वाहतात रुधिर नद्या

अतिवृष्टीने कोनाकोनांत धावणाऱ्या पाण्याच्या


कण कण शोधतात तुझे स्पर्श

जे आहेत शाश्वत चंद्रसूर्याप्रमाणे

धुंद नशिली कंपने उठतात

सागरलाटा अगणित प्रचंड

आणि माझे शब्द जे तुझेच आहेत

विरतात आसक्त अधरात


फक्त तूच त्यांचा नाद ऐकू शकतो

त्यांना प्रवाही करू शकतो

हा संधिप्रकाशही खुपतो माझ्या डोळ्यांना

मला हवीय ती काळी रात्र

जी साऱ्या जगाला अंध करून

निपचित निजून जाईल


ताऱ्यांनी भारलेल्या आभाळाच्या

उल्का गळून जाव्यात

सूर्याने ओरबाडून घ्यावे चंद्राचे तेज

मग या मिट्ट काळोखी जगात

आपल्या मिलनाचं संगीत ऐकू यावं

फक्त आपल्या दोघांना                                 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract