मी अन ती
मी अन ती
मी तुला नि तू मला
पहातच राहावे
दिगंताचे हे क्षण
असेच अंतरी मी साठवावे
तुज्या नयनात बुडावे
माज्या अंतरीचे बीज खुळावे
तुज जे कधी न उमजले
ते स्पर्शून समजावे
मी हसताना तू हसावे
मी रडताना तू रडावे
अश्रू सुखाचे अन दुःखाचे
माज्या मानीचर तू डोळयात साठवावे
असेच अंती मी साठवावे