मेनका!!
मेनका!!
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
63
ती जेव्हा मेनका बनली,
मी विश्वामित्र झालो!
तिने जेव्हा चूल मांडली,
मी चुलीसाठी सरपण झालो!
तिच्या हातांना चटके बसले,
मी तळव्यांची मेंदी झालो!
ती माझा श्वास ठरली,
मी तिचे हृदय झालो!
तिने हळूवार डोळे मिटले,
मी अलगद पापण्या झालो!
ती माझी काठी बनली,
मी तिचा खांदा झालो!
रेटता रेटला आयुष्याचा गाड़ा,
उमजले नाही मी कुठे आलो?
तिच्या सोबतीत मी हरविलो,
विचारू नका मी कसा आलो?