कबूल !
कबूल !
1 min
25
जाता जाता हसू आलं तर कबूल
हसता-खेळता मरण आलं तर कबूल !
कोणतीही असो परीक्षा जगण्याची
तुझ्या मिठीत मरण आलं तर कबूल !
देहाने का भोगावी सतत सर्व शिक्षा
अतृप्त आसक्त मनाला मरण आलं तर कबूल !
कातडीने झिजावे अन झरे फुटावे घामाचे
आत्म्यालाहि झिजता आलं तर कबूल !
आता किती वाट बघावी प्रसिद्धीची
उजेडातच मरण आलं तर कबूल !
माणसासारखं जगता आलं तर कबूल