"नुसतच कविता लिहिणं !
"नुसतच कविता लिहिणं !

1 min

27
शब्द वेडया भावनांना कल्पनेचा नाद असू दे
कळू दे जगाला तुझं नुसतच कविता लिहिणं
अलंकारांची फुलं उधळ, शृंगाराचे मोती सजू दे
कळू दे जगाला तुझं नुसतच कविता लिहिणं
दु:खाचे पाढे वाच अन वेदनांच्या कथा असू दे
कळू दे जगाला तुझं नुसतच कविता लिहिणं
कवितेला तुझी कीव यावी ती परी बनून येऊ दे
कळू दे जगाला तुझं नुसतच कविता लिहिणं!!
लेखणी तुझी मोलाची मेणाचीच तलवार असू दे
कळू दे जगाला तुझं नुसतच कविता लिहिणं
त्या चुरगळलेल्या कागदात तुझे अश्रूही दिसू दे
कळू दे जगाला तुझं नुसतंच कविता लिहिण