मैत्री
मैत्री
मैत्रीचं नात हे रक्ताच्या
नात्यापेक्षाही श्रेष्ठ आहे
म्हणूनच आपली मैत्री ही अशी
ग्रेट आहे
तुझ्या केसांत तू माळते गजरा
त्याचा सुगंध हृदयात दरवळतो माझ्या
मैत्री ही आपली अशीच आहे
ठेच तुला लागते
पण डोळ्यातून अश्रू माझ्या वाहते...
सुषमा आणि पवनची
मैत्री ही अशी जणू
कृष्णा आणि राधेची जोडी
शोभते जशी
मैत्री एक श्वास आहे
दोघांमध्ये असलेला अतूट
असा विश्वास आहे...
मैत्री कधी शहाण्याशी नसते होत
मैत्रीत थोडं वेडं व्हावंसं लागतं
मनातून मित्रत्व जपता यावं पण लागतं
अशीच तू माझी मैत्रीण
थोडी शहाणी-थोडी वेडी
माझी सुंदर अशी मैत्री हृदयातून जपणारी
माझी पहिली मैत्रीण...
विसरू नको कधी तुझ्या या वेड्या मित्राला
हा वेड्यासारखं जपून ठेवले काळजात
माझ्या मैत्रिणीला...

