मैत्री
मैत्री
मैत्री असावी अशी
निर्मळ मनाशी जुळणारी
नात्यातील गोडवा वाढवणारी
विश्वासाला अर्थ प्राप्त करणारी.
प्रेमाचा ओढा बनणारी
कठीण काळी ढाल बनणारी
संकट काळी हात देणारी
मज्जा मस्तीत कायम राहणारी
सतत आनंदी ठेवणारी
कधी तरी हक्काने रागवणारी
प्रेमाने ओरडणारी
मैत्री असावी अशी
गुलाबाच्या फुलाप्रमाणे
सुगंध देणारी
तर काट्याप्रमाणे
रक्षण करणारी
प्रत्येकाकडे असावी अशी
एक मैत्रीण
जी हक्काने बोलणारी
चुकीच्या वेळी रागावणारी
या विशाल सागरा सारखी
सर्वांना एकत्र करणारी
समुद्राच्या लाटे सारखी
मैत्रीच्या प्रवाहात वाहून देणारी
आयुष्यभर साथ देणारी
