STORYMIRROR

Bahinabai Choudhari

Classics

0  

Bahinabai Choudhari

Classics

मानूस मानूस मतलबी रे मानसा

मानूस मानूस मतलबी रे मानसा

1 min
1.5K


मानूस मानूस मतलबी रे मानसा, तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा मानसा मानसा...


तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर, भरला डाडोर भूलीसनी जातो सूद खाईसनी चारा...


गाय म्हैस देते दूध मतलबासाठीं मान मानूस डोलये इमानाच्यासाठीं कुत्रा शेंपूट हालये...


मानसा मानसा कधीं व्हशीन मानूस लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics