Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Santosh Raut

Children

2  

Santosh Raut

Children

मानलं पाहिजे तुला..

मानलं पाहिजे तुला..

2 mins
59


वाह! रे कोरोना वाह!

मानलं पाहिजे तुला 😷

विदेशी कोरोनाने

चालना दिली स्वदेशीला

वाह! रे कोरोना वाह!

मानलं पाहिजे तुला 😷


सगळे सांगून थकले

पण उमजत नव्हतं मला

वाह! रे कोरोना वाह!

मानलं पाहिजे तुला 😷


नद्या झाल्या स्वच्छ,

वातावरण झाले प्रदूषणमुक्त

सहज साध्य केलीस

अवघड अशी ही कला

वाह! रे कोरोना वाह!

मानलं पाहिजे तुला 😷


प्रवासाला जाताना

जागा भेटत नव्हती मला

आता अख्खी एक सीट

मिळतेय एकट्याला

वाह! रे कोरोना वाह!

मानलं पाहिजे तुला 😷


गाडीत छेड काढणाऱ्यांची

होती वेगळीच कला

खेटून उभे राहण्याची हिम्मत 

आहे का आता त्याला

वाह! रे कोरोना वाह!

मानलं पाहिजे तुला.. 😷


सण-समारंभाच्या खर्चाला

जबरदस्त फाटा तू रे दिला

थोर समाजसुधारकांचे

बोल खरे करून गेला

वाह! रे कोरोना वाह!

मानलं पाहिजे तुला.. 😷


वडीलधारे सांगायचे

"आपण भलं आपलं काम भलं"

कधी समजलच नाही आम्हाला 

वाह! रे कोरोना वाह!

मानलं पाहिजे तुला.. 😷


चायनीज डिश व मांसाहाराचा

कहर सतत वाढत गेला

आता मात्र सर्वांनाच

शाकाहार पटायला लागला

वाह रे कोरोना वाह!

खरंच, मानलं पाहिजे तुला.. 😷


आता थांबव हा संहार तुझा

सारे विश्व विनवतंय तुला

जा आता परत मायदेशी

अन्यथा भारतच संपवेल तुला

भारतीयच संपवतील तुला.😷


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children