STORYMIRROR

Santosh Raut

Children Stories Tragedy Others

3  

Santosh Raut

Children Stories Tragedy Others

जगू दे जगाच्या पोशिंद्याला

जगू दे जगाच्या पोशिंद्याला

1 min
89

दाटलेले मेघ ते पाहुनी

भीती वाटते मनात,

कधी देतोस बरकत

कधी धस्स काळजात II

नको नको रे पावसा

बळी पोशिंद्याचा घेऊ,

जर जगला पोशिंदा

तरच सारे पोटभर खाऊ II

भयाण ते ढग जरी आकाशात

परी पाणी शेतकऱ्याच्या डोळ्यात,

दुःख सांगेल तो कोणाला

कुणीच ऐकेना हो कैफियत II

एक विनंती निसर्गराजाला

जरी चूक ही मानवाची,

निरपराध कृषकाला

नको शिक्षा देऊ त्याची II

मेघा, तू हवाच रे आम्हाला

परी आता आवर स्वतःला,

एक विनंती रे माझी

जगू दे जगाच्या पोशिंद्याला II


Rate this content
Log in