माझी शाळा
माझी शाळा
यायचंय परत मला
पुन्हा तुझ्या कुशीत
मुक्तपणे उडायला आणि,
शिस्तीतच बागडायला
हवा आहे आता मला
पहाटेचा नकोसा गजर
पापण्यांवरची झोप झटकत
बससाठी व्हायचंय हजर
माझे फ्रेन्ड्स, टीचर्स
आणि माझा वर्ग,
आहे सगळंच खास
आवडते मला फील्ड व्हिजिट
आणि पीटीचा ही तास
शाळेच्या नाश्त्याचा आस्वाद
परत आता घ्यायचाय
युनिफॉर्म अणि आय-कार्डचा,
साजही आता ल्यायचाय
लॅपटॉप, मोबाईल, अपलोडिंग
आलाय आता कंटाळा,
सांग सांग भोलानाथ
कधी सुरू होणार शाळा?
