STORYMIRROR

SANGITA WADEKAR

Abstract

4  

SANGITA WADEKAR

Abstract

माझे बाबा

माझे बाबा

1 min
397

कसे फेडू मी या जन्माचे अगणित पितृऋण

माय माझी खेळण्यातली भातुकली, बाप मायेचा द्रोण

होता जन्म माझा, किती आनंद झाला तुजला

माय झाली मोकळी, तुझा श्वास माझ्यात गुंतला.....||१||


केले संगोपन हर्षाने अन् छुमछुमत्या कोड कौतुकाने

रुजवले संस्कार मोती, प्रेमाने तर कधी करड्या नजरेने

हात हाती प्रथम तुझाच होता, माझ्या पावलावर तुझे पाऊल

तुझी करंगळी माझा आधार, मना भावी तुज बोबडे बोल.....||२||


लटका राग माझा अन् फुगलेले टssम गुलाबी गाल

करी घोडा घेऊनी खांद्यावर, लडिवाळे, होई दबकीच चाल

होता रजस्विता रेखिली, तळहातावर ओल्या मेहंदीची जळमटे

सोडताना हात तुझा, हृदयांतरीची अनामिक हुरहूर वाढे.....||३||


अंगुली तुझी नि माझी, जुळवी अनोखी रेशमी बंध गाठी

नको करूस भ्रांत, हीच अंगुली आधारवड होईल तुजसाठी

सोसत टाकीचे घाव, मूक वेदनेचा पिऊन अंगार झाला देवमाणूस

अडचणींचे डोंगर करूनी पार, हर्षाचा वर्षवी तू पाऊस.....||४||


पडद्यामागील भूमिका लिलया निभावी, तू अद्वितीय कलाकार

उन्हात फुलवी चांदणे कष्टाचे, मम जीवनाचा खरा शिल्पकार

नामस्मरण सदा तुझेच बाबा, गुलाबी पाकळ्यांच्या ओठी

नाते आपुले हृदयांतरीचे, जन्म घ्यावा पुन्हा तुझ्याच पोटी.....||५||


Rate this content
Log in

More marathi poem from SANGITA WADEKAR

Similar marathi poem from Abstract