मॕरिटल....वॕलेंटाईन डे
मॕरिटल....वॕलेंटाईन डे
व्हेलेंटाईन डेच अप्रुप नाही राहील पहिल्या सारख जरी
तरी प्रेम कमी झालय आस नाही.....कारण ...
अजुनही मला तोच लागतो सकाळचा उगवलेला सुर्य दाखवायला....
आयुष्यातील प्रवासात माझ्याच वेगाने चालतानापण वेळोवेळी सांभाळायला अजुनही मला तोच लागतो ....
जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या अथक श्रमातूनही....
अट्टाहासाने स्वतः साठी जगण्याची आठवण करुन द्यायला ....आजुनही मला तोच लागतो.....
सगळ्यांना सामावून दोन्हीकडची नाती मीच चार्ज ठेवत असेल कदाचित....
पण माझ्या संवेदनशील मनाचा फोन चार्ज करायला अजुनही मला तोच लागतो .......
संध्याकाळी घरी येते, पिल्लू धावत दार उघडतं...
त्याला जवळ घेऊन त्याची अखंड बडबड ऐकताना माझी नजर घरभर भिरभिरते.....
हे सगळ हसून बघत नजरेनेच 'मी आहे' ही सुखद जाणीव द्यायला अजुनही मला तोच लागतो ....
दिवसभराचा क्षीण बाजूला सारुन....
रात्री घराचे, शरीराचे आणि मनाचे दिवे मालवून...
खांद्यावर निवांत डोळे मिटायला ...
अजुनही मला तोच लागतो ......
म्हणूनच व्हेलेंटाईन डे च आता अप्रुप नसलं तरी....
माझ्या त्याच्या बहरलेल्या नात्याचं अप्रुप आहे मला.....
हेच अप्रुप मिरवायला पण अजुनही मला तोच लागतो ......

