कविता मन वारू
कविता मन वारू
उधळले का चौफेर
एकएकी *मन वारू*
तुझा ध्यास घेतलेल्या
कसे मनाला आवरू...
मखमली ते आठव
आले फिरून स्वच्छंद
गाभुळली प्रीत वेल
नवे पेरून आनंद ...
सुख क्षणांची ओंजळ
वाहे सदैव भरून
माप सुखाचे लांघले
कर तुझेच धरून....
नियतीने केली थट्टा
कसा झाला हा आघात
शब्द विरले हवेत
सदा तूच रे मनात...
समजावू कसे मना
तुझे अस्तित्व संपले
घालमेल या मनाची
माझी मीच ना उरले...
*मन बावरे* पाखरू
मोठे चंचल अस्थिर
तुला शोधते नजर
आसपास भिरभिर ...
