STORYMIRROR

SHRISH JOSHI

Action

3  

SHRISH JOSHI

Action

कविता अशी साकारते

कविता अशी साकारते

1 min
167

डोक्यात असते कल्पना 

कल्पनेला येतो आकार 

शब्दाला शब्द जुळत जातो 

अन् कविता घेते आकार || 


स्थान नसतं ठरलेलं 

विषयही नसतो ठरलेला 

अनेक विचारांच्या काहुराने 

मनाचा घडा असतो भरलेला ||


कुठला विषय डोकावेल 

कवीलाही नसते कल्पना 

विषयानुसार काव्य करण्यास 

सांगता येत नाही स्वमना ||


कवी असतो मानी 

खपवून घेत नाही गुलामी 

कलाकलाने कवीला खुलवायला

करावी लागते युक्ती नामी ||


कुठल्याही कवीला विचारा 

किती घालतो येरझारा 

कधी तरीच पाझरतो 

कवीच्या प्रतिभेचा मुक्त झरा ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action