STORYMIRROR

Buddhabhushan Gangawane

Romance

2  

Buddhabhushan Gangawane

Romance

कसले कारण मागतेस?

कसले कारण मागतेस?

1 min
14.2K


कसले कारण मागतेस 

तुझ्यावर प्रेम करण्याचे

कसले कारण मागतेस 

तुझ्यावर मन जडण्याचे. 

तू आशा आहेस माझी 

तू प्रेरणा आहेस माझी 

माझ्या जीवनाचा ध्यास

माझ्या जगण्याची आस आहेस तू.

तू श्वास आहेस माझा 

श्वास घेण्याच कारण मागतेस

तू प्राण आहेस माझा 

माझ्या जगण्याच कारण मागतेस.

प्रेमाचा आरंभ तू

जीवनाचा एकमेव शेवट तू

जगण्याचे कारण आहेस तू 

माझ्या अस्तित्वाचे कारण मागतेस. 

ये लाडके नेहमी का विसरतेस

हृदयाची धडधड आहेस तू 

माझ्या विचारांचा उगम तू

तुझ्या आठवणीत रमण्याचे 

कसले कारण मागतेस.

ये वेडे खर सांग 

तू पण माझ्या आठवणीत 

रात्र-रात्र जागतेस

मग वेडाबाई तुझ्यावर प्रेम करण्याचे

कसले कारण मागतेस.

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance