STORYMIRROR

Buddhabhushan Gangawane

Others

3  

Buddhabhushan Gangawane

Others

माझे शब्द...

माझे शब्द...

1 min
14K


माझेच शब्द मला वरदान झालेत

होय त्यांनीच मला जीवनदान दिलय

ओसाड या आयुष्यात प्रेमाचा पाऊस

तुझ्या रूपाने दिला

एक वाहणारा झरा

मन भरून बघावा असा

तुझ्या रूपाने दिला

आणि कितीही बघितलं तरी

मन भरणार नाही हे माहीत असून

तुला बघणारा एकटक बघणारा मी

कधी वाटतं सोडावी शब्दांची साथ

छळतात हे शब्द मला

जुन्या जखमा कोरून काढतात

बंड करतील माझ्याच विरोधात

काही सांगता येत नाही

पण त्या शब्दांनीच पूल बांधला

माझ्या मनापासून तुझ्या मनापर्यंत

समुद्र किनारी एकटा असल्यावर

सोबत असतात फक्त माझे शब्द

माझ्या सोबत हसणारे

माझ्या सोबत रडणारे

फक्त माझे हे वेडे शब्द


Rate this content
Log in