STORYMIRROR

Sameer Gawde

Romance

3  

Sameer Gawde

Romance

कस सांगू मी तुला मला काय वाटतं

कस सांगू मी तुला मला काय वाटतं

1 min
252

पाहताक्षणी तुला, प्रेम मनात दाटतं,

कस सांगू मी तुला, मला काय वाटतं…


तुझा चेहरा जणू पुनवेच चांदणं,

त्यात भर म्हणजे तुझ खोडकर वागणं.

अशी गोड हसलीस की त्या चंद्रासही ग्रहण लागतं,

कस सांगू मी तुला, मला काय वाटतं…


तुझा स्वभाव म्हणजे झरा खळखळता,

मी मात्र संथ त्या समुद्रसारखा.

तुझं माझं मिलन मला अशक्यप्राय वाटतं,

कस सांगू मी तुला, मला काय वाटतं…


तुझा सहवास म्हणजे निर्मळ आनंद,

मी यमक अलंकार तर तू मुक्तछंद.

तुझ्या प्रतिभेसमोर मला नेहमी तोकडं वाटतं,

कस सांगू मी तुला, मला काय वाटतं…


कसा करू प्रयत्न मी तुला भावना सांगण्याचा,

का करशील तू विचारही ह्या फाटक्याचा.

तुला आनंदी पाहण्यातच मला समाधान वाटतं,

कस सांगू मी तुला, मला काय वाटतं…

कस सांगू मी तुला, मला काय वाटतं…


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance