*करून दृढ निश्चय तुम्ही "आत्मनिर्भय" व्हावे.*

एकलव्याची एकाग्रता स्मरून
स्व-अध्ययन करावे.
अचूक धेय्याचा निशाणा
साधून "लक्ष-भेद" करावे.
*करून दृढ निश्चय तुम्ही "आत्मनिर्भय" व्हावे.*
अ॓तरिक्षीची झेप घेऊनी
चाॅद्रमोहीमेवर जावे.
अवकाशाचे सुक्ष्म अवलोकन करूनी
"अवकाशस्थ तारा॓गणा" कल्पना व्हावे.
*करून दृढ निश्चय तुम्ही "आत्मनिर्भय" व्हावे.*
डिजिटीयलचे ज्ञान शिकुनी
चुटकित दैनिक व्यवहार करावे.
आय.टी., इलेक्ट्रॉन तंत्रज्ञानाने
देशाला "समृद्ध" करावे.
*करून दृढ निश्चय तुम्ही "आत्मनिर्भय" व्हावे.*
वैद्यकीय करून स॑शोधन
प्रभावी प्रतिजैविक शोधावे.
महामारीचे करून उच्चाटन
"सुदृढ-निरोगी" भारत करावे.
*करून दृढ निश्चय तुम्ही "आत्मनिर्भय" व्हावे.*
चाणक्याची चाणक्यनीती शिकून
रास्त न्याय-निवाडे करावे.
शिवरायांची राजनीती पाहून
जनतेचे "सुराज्य " करावे.
*करून दृढ निश्चय तुम्ही "आत्मनिर्भय" व्हावे.*
मातृभूमीच्या रक्षणार्थ लढण्यासाठी
देशाच्या सिमारेषेवर जावे.
क॑ठस्नान घालून क्रुर शत्रुला
"परमवीर चक्र" पदक मिळवावे
*करून दृढ निश्चय तुम्ही "आत्मनिर्भय" व्हावे.*.