कर्तव्य
कर्तव्य
कर्तव्या परी
शरीर उरावे
मानाने जगावे
जीवना सरी।।१।।
तुमचे माझे
कर्तव्य वेगळे
करावे सगळे
जीवना साझे।।२।।
निभावे असे
हेतू ना अपेक्षा
नसावी उपेक्षा
निर्मळ जसे।।३।।
कर्तव्य दक्ष
जीवनाच्या धारा
कर्मरूपी सारा
रहा नी:पक्ष।।४।।
झटत रहा
कर्तव्य हे धर्म
तुझेच हे कर्म
अंतरी पहा।।५ ।।
या हात धरा
निसर्ग रक्षण
थांबवा भक्षण
कर्तव्य करा।।६।।